Hebrews 8:3 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक मुख्य याजक जो नेमलेला असतो, त्याला दाने व अर्पणे सादर करावी लागतात, म्हणून आपल्या ह्या मुख्य याजकालादेखील काहीतरी सादर करणे जरुरीचे होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पण करण्याकरिता नेमलेला असतो, म्हणून आपल्या याजकाजवळही अर्पण करण्याकरिता काहीतरी असणे अगत्याचे आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रत्येक प्रमुख याजक दाने व यज्ञ अर्पण करण्यास नेमलेला असतो, म्हणून ह्याच्याजवळही अर्पण करण्यास काहीतरी असणे अगत्याचे आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि ज्याअर्थी प्रत्येक महायाजक दाने व यज्ञार्पण करण्यासाठी नेमलेला असतो, म्हणून यांच्या जवळही अर्पण करण्यास काहीतरी असणे आवश्यक आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक महायाजकाची नेमणूक दाने व अर्पणे सादर करण्यासाठी झालेली असते, म्हणून ह्याच्याजवळही अर्पिण्यास काहीतरी असणे जरुरीचे होते.