Hebrews 9:11 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण आता ख्रिस्त हा घडून आलेल्या चांगल्या गोष्टींचा मुख्य याजक म्हणून आला आहे. तो मनुष्याच्या हातांनी बांधला नव्हता अशा महान तसेच सर्व दृष्टींनी परिपूर्ण अशा मंडपामध्ये, या निर्मितीमधील,
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ख्रिस्त हा उपलब्ध असलेल्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक म्हणून आला व जो मंडप हातांनी केलेला नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही अशा अधिक श्रेष्ठ व परिपूर्ण मंडपातून
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ख्रिस्त हा पुढे होणार्‍या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक होऊन आला व जो हातांनी केलेला नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु जेव्हा चांगल्या गोष्टी ज्या आता येथे आहेत त्यांचा महायाजक म्हणून ख्रिस्त आले होते, जो मानवी हाताने केलेला नाही व जो या सृष्टीचा भाग नाही, अशा अधिक महान व अधिक परिपूर्ण मंडपाद्वारे आत गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण आता ख्रिस्त हा घडून आलेल्या चांगल्या गोष्टींचा महायाजक म्हणून आला आहे आणि अधिक मोठा व अधिक पूर्ण, मनुष्याच्या हातांनी केलेला नव्हे, म्हणजे या सृष्टीतला नाही, अशा मंडपाच्याव्दारे,