Hebrews 9:19 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण नियमशास्त्राची प्रत्येक आज्ञा सर्व लोकांसमोर जाहीर केल्यानंतर मोशेने पाण्याबरोबर वासराचे व बकऱ्याचे रक्त तसेच किरमीजी लोकार आणि एजोबाच्या फांद्या हे सर्व बरोबर घेतले; आणि ते त्याने नियमशास्त्राच्या पुस्तकावर आणि सर्व लोकांवर शिंपडले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
नियमशास्त्रानुसार सर्व आज्ञा सर्व लोकांना सांगितल्यावर मोशेने पाणी, किरमिजी लोकर, एजोब वनस्पतीची डहाळी व त्यांबरोबर वासरांचे व बकऱ्यांचे रक्त घेऊन नियमशास्त्राच्या ग्रंथावर व सर्व लोकांवरही सिंचन करीत म्हटले:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नियमशास्त्राप्रमाणे सर्व आज्ञा सर्व लोकांना सांगितल्यावर मोशेने पाणी, किरमिजी लोकर व एजोब वनस्पती व त्यांबरोबर वासरांचे व बकर्यांचे रक्त घेऊन ग्रंथावर व सर्व लोकांवरही सिंचन करत म्हटले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा मोशेने सर्व लोकांना नियम जाहीर केले, तेव्हा त्याने पाण्याबरोबर वासरांचे रक्त घेतले आणि किरमिजी लोकर व एजोबाच्या फांद्या त्यात बुडवून ग्रंथावर आणि सर्व लोकांवर ते शिंपडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण नियमशास्त्राची प्रत्येक आज्ञा सर्व लोकांसमोर जाहीर केल्यानंतर मोशेने पाण्याबरोबर वासराचे व बकऱ्याचे रक्त तसेच किरमिजी लोकर आणि एजोबाच्या फांद्या हे सर्व बरोबर घेतले; आणि ते त्याने नियमशास्त्राच्या पुस्तकावर आणि सर्व लोकांवर शिंपडले.