Hebrews 9:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची वेदी होती. आणि कराराची पेटी (कोष). ही पेटी (कोष) संपूर्ण सोन्याने मढवलेली होती त्या पेटीत (कोषात) एका सोन्याच्या भांड्यात मान्रा होता, तसेच अहरोनाची काठी जिला पाने फुटलेली होती व कराराच्या दगडी पाट्या होत्या.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यात सोन्याचे धुपाटणे व चहूबाजूंनी सोन्याने मढविलेली कराराची पेटी होती; ह्या पेटीत मान्ना ठेवलेले सुवर्णपात्र, पालवी फुटलेली अहरोनची काठी व कराराच्या दोन पाट्या होत्या
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याने चहूबाजूंनी मढवलेला कराराचा कोश होता; ह्या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्णपात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या होत्या;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यात सोन्याची धूपवेदी सोन्याने आच्छादलेला कराराचा कोश होता. या कोशात मान्ना असलेले एक सुवर्णपात्र, अंकुर फुटलेली अहरोनाची काठी व कराराच्या दगडी पाट्या होत्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची धूपाटणे आणि संपूर्ण सोन्याने मढवलेला कराराचा कोष लाकडी पेटी होती. त्या कोषात एका सोन्याच्या भांड्यात मान्ना होता, तसेच कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या दगडी पाट्या होत्या.