Hebrews 9:5 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या पेटीवर (कोषावर) गौरवाचे करूबीम दयासनावर सावली करीत होते. परंतु या गोष्टींबाबत सविस्तर चर्चा आता आपण करू शकत नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेजस्वी करूबिम दयासन आच्छादीत होते; परंतु याविषयी सविस्तर बोलण्याची ही वेळ नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्याच्यावरचे गौरवशाली करूबीम दयासनावर छाया करत होते; ह्यांविषयी आता सविस्तर सांगत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि दयासनावर छाया करणारे गौरवी करूबीम होते; पण एवढा तपशील पुरे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या कोषावर गौरवाचे करुबीम दयासनावर सावली करीत होते. परंतु आता याबाबत सविस्तर सांगत नाही.