Hosea 1:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग गोमरला पुन्हा दिवस गेले. ह्या खेपेस तिने एका मुलीला जन्म दिला. परमेश्वर होशेयला म्हणाला, “तिचे नाव लो - रूहामा ठेव. का? कारण मी यापुढे इस्राएल राष्टाला अजिबात दया दाखविणा नाही. मी त्यांना क्षमा करणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यानंतर ती पुन्हा गर्भवती होऊन तिला कन्या झाली. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “हिचे नाव लो-रुहामा (दया न पावलेली) ठेव; कारण इस्राएल घराण्याला क्षमा करण्याइतकी दया मी त्यांच्यावर पुन्हा करणार नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गोमेर पुन्हा गर्भवती झाली आणि तिने कन्येला जन्म दिला. तेव्हा याहवेह होशेयला म्हणाले, “हिचे नाव लो-रुहामा असे ठेव, कारण येथून पुढे त्यांना क्षमा करावी अशी प्रीती मी इस्राएलवर दाखविणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गोमर पुन्हा गरोदर झाली आणि तिला मुलगी झाली तेव्हा परमेश्वर होशेय ला म्हणाला हिचे नांव लो-रुहामा ठेव कारण यापुढे मी इस्राएल राष्ट्रावर दया करणार नाही व त्यास क्षमा करणार नाही.