Hosea 10:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एफ्राईम शिकविलेल्या तरुन कालवडीप्रमाणे आहे. तिला खळ्यातील धान्यावरुन चालायला आवडते. मी तिच्या गळ्यात चांगले जोखड अडकवीन. एफ्राईमला दोराने बांधीन मग यहूदा नांगरणी करील याकोब स्वत: ढेकळे फोडील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एफ्राईम शिकवलेली कालवड आहे, तिला मळणी करण्याची आवड आहे; मी तिच्या सुंदर मानेवर जूं ठेवीन, मी एफ्राइमाला जुंपीन; यहूदा नांगरील; याकोब कोळपील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एफ्राईम शिकविलेली कालवड आहे. तिला मळणी करण्याची आवड आहे; म्हणून मी तिच्या नाजूक मानेवर जू ठेवेन. मी एफ्राईमला नांगराला जुंपेन, यहूदाहला नांगरणी करणे व याकोबाला माती फोडणे आवश्यक आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एफ्राईम ही प्रशिक्षित कालवड आहे तिला मळणी करायला आवडते म्हणून मी तिच्या गोऱ्या मानेवर जू ठेवीन. मी एफ्राईमावर जू ठेवीन, यहूदा नांगरील, याकोब ढेकळे फोडील.