Hosea 10:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते वचने देतात पण ते फक्त खोटो बोलत असतात. ते आपला शब्द पाळत नाहीत. ते दुसऱ्या देशांबरोबर करार करतात. परमेश्वराला ते करार आवडत नाहीत. न्यायाधीश नांगरलेल्या शेतात वाढणाऱ्या विषारी तणाप्रमाणे आहेत
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते फक्त वचने बोलतात, खोट्या प्रतिज्ञा करतात, करार करतात, म्हणून शेताच्या तासात विषवल्ली उगवते तसे त्यांच्यासाठी प्रतिफळ उगवेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते अनेक अभिवचने देतात, खोट्या शपथा घेतात आणि करार करतात; त्यामुळे नांगरलेल्या शेतात उगविलेल्या विषारी तणाप्रमाणे खटले सुरू होतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते पोकळ शब्द बोलतात खोट्या शपथा वाहून करार करतात, म्हणून जसे शेताच्या तासात विषारी रानटी झुडूप उगवतात तसा त्यांच्यावर न्याय येईल.