Hosea 11:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी त्यांना दोऱ्यांनी बांधून नेले. पण त्या प्रेमाच्या दोऱ्या होत्या. मी त्यांना मुक्त करणाऱ्या माणसाप्रमाणे होतो. मी खाली वाकून त्यांना जेवू घातले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मानवी बंधनांनी, प्रेमरज्जूंनी, मी त्यांना ओढले; बैलाच्या गळ्यातले जोते सैल करणार्यासारखा मी त्यांना झालो; त्यांना मी ममतेने खाऊ घातले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी त्यांना मानवी दयाळूपणाच्या दोरीने आणि प्रीतीच्या बंधनाने चालविले. त्यांच्यासाठी मी एखाद्या लहान मुलाला गालापर्यंत उचलल्यासारखा होतो, आणि मी खाली वाकून त्यांना खायला घालत असे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी त्यांना मानवता आणि प्रेमाच्या दोरीने चालवत होतो मी त्यांना त्यासारखा होतो जो तोंडावरचे जू काढतो आणि मी खाली वाकून त्यांना खाऊ घातले.