Hosea 12:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याकोबने आईच्या गर्भात असल्यापासूनच त्याच्या भावाला फसवायला सुरवात केली. याकोब शक्तिशाली तरुण होता. त्या वेळी तो परमेश्वराविरुध्द लढला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गर्भाशयात असता त्याने आपल्या भावाची टाच धरली; तो आपल्या भरज्वानीत असता देवाबरोबर झगडला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने गर्भात असता आपल्या भावाची टाच धरली; एका मनुष्य असून त्याने परमेश्वराशी झुंज केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गर्भात असता याकोबाने आपल्या भावाची टाच घट्ट धरली, आणि तरुणपणी देवासोबत झोंबी केली.