Hosea 13:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शोमरोनला शिक्षा झालीच पाहिजे, का? कारण तिने परमेश्वराकडे पाठ फिरविली. इस्राएली तलवारीला बळी पडतील. त्यांच्या मुलांची खांडोळी केली जाईल. त्यांच्या गर्भवती स्त्रियांना फाडून टाकले जाईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शोमरोनास प्रायश्‍चित्त मिळेल कारण तो आपल्या देवापासून फितूर झाला आहे; ते तलवारीने पडतील, त्यांची अर्भके आपटून मारतील, त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शोमरोनच्या लोकांनी त्यांचा दोष वाहिलाच पाहिजे, कारण त्यांनी त्यांच्या परमेश्वराविरुद्ध बंड केले. ते तलवारीने पडतील; त्यांची बालके जमिनीवर आपटली जातील, आणि त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकण्यात येईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शोमरोनात दोष येईल, कारण त्याने देवाविरुध्द बंड केले आहे ते तलवारीने पडतील. त्यांची लहान मुले आपटली जातील आणि त्यांच्या गर्भवती स्त्रिया चिरुन टाकण्यात येतील.