Hosea 13:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते इस्राएली अधिकच पाप करतात. ते स्वत:साठी मूर्ती तयार करतात. कारागिर चमत्कतिपूर्ण चांदीच्या मूर्ती घडवितात व ते लोक त्या मूर्तीशी बोलतात. ते त्या मूर्तीपुढे बळी देतात. सोन्याच्या वासरांचे ते चुंबन घेतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते आताही अधिकाधिक पाप करीत आहेत, ते आपल्याजवळच्या रुप्याच्या आपणांसाठी ओतीव मूर्ती करीत आहेत; ते आपल्या कल्पनेप्रमाणे मूर्ती करीत आहेत; त्या सर्व कारागिरांच्या कृती आहेत; ते अशा मूर्तींबरोबर बोलतात, यज्ञ करणारी माणसे वासरांचे चुंबन घेतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता ते अधिकाधिक पाप करीत आहेत; ते आपल्या चांदीपासून स्वतःसाठी मूर्ती बनवतात, हुशारीने तयार केलेल्या प्रतिमा, त्या सर्व कारागिरांची हस्तकृती आहेत. या लोकांबद्दल असे म्हटले जाते, “हे नरबली देतात! ते वासराच्या मूर्तीचे चुंबन घेतात!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता ते अधिकाधिक पाप करु लागले ते चांदीच्या ओतीव मूर्ती आपल्या कुशलतेने कारागीर बनवतो तसे बनवू लागले. लोक म्हणू लागले, “जे बलिदान करतात त्यांनी वासरांचे चुंबन घ्या”