Hosea 13:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ह्याच कारणामुळे ते लोक लवकरच अदृश्य होतील. सकाळच्या धुक्याप्रमाणे त्यांची स्थिती होईल. सकाळी धुके थोड्यावेळ दिसते. व लगेच नाहीस होते. इस्राएलींची दशा खळ्यातून उडणाऱ्या फोलकटाप्रमाणे होईल. धुराड्यातून निघणारा धूर काही क्षणातच दिसेनासा होतो, तसे त्याचे होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव ते सकाळच्या अभ्रासारखे, लवकर उडून जाणार्या दहिवरासारखे होतील, खळ्यातून वावटळीने उडणार्या भुसाप्रमाणे, धुराड्यातून निघणार्या धुराप्रमाणे ते होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून ते सकाळच्या धुक्यासारखे, पहाटेच्या लवकर उडून जाणार्या दहिवरासारखे, खळ्यातून उडून जाणार्या भुशासारखे, धुराड्यातून निघणार्या धुराप्रमाणे होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून पहाटेच्या ढगासारखे लवकर उडून जाणाऱ्या दवासारखे खळ्यातून वाऱ्याने उडणाऱ्या भुसासारखे आणि धुराडयातून उडणाऱ्या धुरासारखे ते होतील.