Hosea 2:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मी तिच्या द्राक्षवेलींचा व तिच्या अंजिराच्या झाडांचा नाश करीन. ती म्हणाली होती, ‘माझ्या प्रियकरांनी मला या गोष्टी दिल्या’ पण मी तिच्या बागांचे रूप पालटून. त्या जंगलाप्रमाणे होतील. वन्या पशू येऊन झाडे खातील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या आपल्या द्राक्षालतांविषयी व अंजिराच्या झाडांविषयी ती म्हणत असे की, ‘ही माझ्या वल्लभांनी दिलेली माझी वेतने आहेत.’ ती मी उद्ध्वस्त करीन; मी त्यांचे रान बनवीन, आणि ती वनपशू खाऊन टाकतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तिच्या द्राक्षमळ्यांचा व अंजिराच्या झाडांचा नाश करेन, जो तिच्या प्रियकरांनी तिला वेतन म्हणून दिला होता, असे तिचे म्हणणे आहे; मी त्यांचे गर्द झाडी करेन व वनपशू ते खाऊन टाकतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तिच्या द्राक्षवेली आणि अंजिराची झाडे नष्ट करीन, ज्या विषयी ती म्हणाली होती, माझ्या प्रियकरांनी दिलेली ही माझी वेतने आहेत. मी त्याचे रान करीन आणि वन्य पशू येऊन ते फस्त करतील.