Hosea 2:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेथे मी तिला द्राक्षमळे देईन अखोरची दरी आशेचे द्वार म्हणून देईन. मग तिच्या तरुणपणी मिसर देशातून बाहेर आल्यावर ज्याप्रमाणे तिने प्रत्युत्तर दिले होते, ती देईल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथून मी तिचे द्राक्षीचे मळे तिला देईन; आशेचे द्वार व्हावे म्हणून मी तिला अखोर1 खिंड देईन; ती आपल्या तारुण्याच्या दिवसांतल्याप्रमाणे, ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसांतल्याप्रमाणे, माझे बोलणे त्या ठिकाणी ऐकेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथे मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन, आणि अखोरचे खोरे तिला आशेचे द्वार असे देईन. जेव्हा ती इजिप्तमधून बाहेर आली, तिच्या तारुण्याच्या दिवसात जसे उत्तर देत होती तसेच उत्तर देईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तिला तिचे द्राक्षमळे परत करेन, आशेचे दार म्हणून अखोरचे खोरे देईन. तेव्हा ती मला उत्तर देईल, जसे तिने आपल्या तरुणपणी दिले होते, जेव्हा ती मिसर देशातून आली होती.