Hosea 2:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“त्या वेळेला, मी इस्राएली लोकांसाठी रानातल्या प्राण्यांबरोबर, आकाशातील पक्ष्यांबरोबर आणि जमिनीवर सरपटणाव्या प्राण्यांबरोबर एक करार करीन. मी धनुष्य तलवार व युध्दात वापरण्यात येणारी शस्त्रे मोडून टाकीन. त्या देशात एकही शस्त्र राहणार नाही. मी देश सुरक्षित करीन, त्यामुळे इस्राएलचे लोक शांतीने झोप घेतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवशी इस्राएलांकरता मी वनपशू, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव ह्यांबरोबर करार करीन; देशातून धनुष्य, तलवार व युद्ध मोडून टाकीन व ते सुखासमाधानाने राहतील असे मी करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दिवशी मी त्यांच्यासाठी रानातील पशू, आकाशातील पक्षी आणि भूमीवर सरपटणारे यांच्यामध्ये मी करार घडवून आणेन. धनुष्य आणि तलवार आणि लढाया मी देशातून काढून टाकेन, म्हणजे तुम्ही सर्वजण सुरक्षितपणे विश्राम कराल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवशी मी इस्राएलासाठी वनपशु, आकाशातील पाखरे, भूमीवर रांगणारे ह्यांसोबत करार करीन. मी देशातून धनुष्य तलवार आणि लढाई नाहीशी करीन, व ते तेथे सुरक्षित वस्ती करतील.