Hosea 2:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तिच्या भूमीत मी तिचे पुष्कळ बीज पेरीन. लो-रूमाहावर मी दया करीन. लो-अम्मीला मी ‘माझे लोक’ म्हणीन. मग ते मला ‘तू माझा परमेश्वर’ मानतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तिला आपणासाठी देशात पेरीन; मी लो-रुहामेवर (दया न पावलेलीवर) दया करीन व लो-अम्मी (माझे लोक नव्हत) ह्यांना ‘तू अम्मी (माझे लोक) आहेस’ असे म्हणेन व ‘तू माझा देव आहेस’ असे ते मला म्हणतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तिची माझ्यासाठी देशात पेरणी करेन; ‘माझी प्रिया नाही ’ असे मी ज्यांना म्हटले त्याला मी माझी प्रीती दाखवेन. जे ‘माझे लोक नाहीत, ’ असे म्हटले त्यांना ‘तुम्ही माझे लोक आहात’ असे म्हणेन; आणि ते म्हणतील, ‘तुम्ही आमचे परमेश्वर आहात.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी स्वत:साठी तिचे रोपण भूमीत करीन, आणि लो रुहामावर दया करीन. जे माझे लोक नव्हते त्यास मी माझे लोक म्हणेन आणि ते मला तू माझा देव आहेस असे म्हणतील.