Hosea 2:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तिने जर व्यभिचार करण्याचे सोडण्यास नकार दिला तर मी तिला नग्न करीन. तिला मी तिच्या जन्माच्या वेळच्या अवस्थेप्रमाणे टाकीन. मी तिचे लोक काढून घेईन मग ती ओसाड रूक्ष वाळवंटाप्रमाणे होईल, मी तिला तहानेने मारीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नाहीतर मी तिला वस्त्ररहित करून ती जन्माच्या दिवशी होती तशी तिला नग्न ठेवीन, तिला वैराणासारखी करीन, तिला निर्जल भूमीसारखी ठेवीन, तिला तहानेने ठार मारीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नाही तर मी तिचे वस्त्र काढून तिला नग्न करेन, जशी तिच्या जन्माच्या दिवशी ती नग्न होती; तिला मी वैराण प्रदेशासारखी करेन, निर्जल भूमीसारखी ठेवेन व तिला तहानेने जिवे मारीन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जर नाही, तर मी तिला नग्न करून जन्माच्या वेळी होती तशी नग्न करीन, मी तिला ओसाड, रुक्ष भूमी सारखे करीन आणि मी तिला तहानेने मारीन.