Hosea 2:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ती तिच्या प्रियकरांमागून धावेल पण त्यांना ती गाठू शकणार नाही. ती तिच्या प्रियकरांना शोधील, पण ते तिला सापडणार नाहीत. मग ती म्हणेल, ‘मी माझ्या पहिल्या पतीकडे (परमेश्वराकडे) परत जाईन. मी त्याच्याजवळ असताना माझे जीवन ह्याहून चांगले होते आतापेक्षा ते आयुष्यच बरं होते.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती आपल्या वल्लभांमागे धावेल, पण ते तिला आटोपणार नाहीत; ती त्यांचा शोध करील, पण ते तिला सापडणार नाहीत; तेव्हा ती म्हणेल, ‘मी आपल्या पहिल्या पतीकडे परत जाईन, कारण तेव्हाची माझी स्थिती आताच्यापेक्षा बरी होती.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती तिच्या प्रियकरांमागे धावेल, पण त्यांना गाठू शकणार नाही. ती त्यांना शोधेल, पण ते तिला सापडणार नाहीत. मग ती म्हणेल, ‘मी आता माझ्या पहिल्या पतीकडे परत जाईन, कारण माझी परिस्थिती सध्यापेक्षा तेव्हा चांगली होती.’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती तिच्या प्रियकरांच्या मागे धावेल पण ती त्यांना गाठू शकणार नाही, ती त्यांचा शोध करेल पण ते तिला सापडणार नाही. मग ती म्हणेल, मी माझ्या पहिल्या नवऱ्याकडे परत जाईल, कारण माझी दशा आतापेक्षा तेव्हा चांगली होती.