Hosea 2:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून, मी (परमेश्वर) परत येईन. मी धान्य पिकताच माझे धान्य व द्राक्षे तयार होताच धान्य आणि द्राक्षरस परत घेईन. मी तिला तिचे उघडे शरीर झाकण्यासाठी दिलेली लोकर व कापड परत घेईन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून पिकाच्या वेळी माझे धान्य व हंगामाच्या वेळी माझा द्राक्षारस मी अटकावून ठेवीन व तिची नग्नता झाकण्यासाठी तिला दिलेली माझी लोकर व माझा ताग हिरावून घेईन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“म्हणून जेव्हा माझे धान्य पिकेल मी ते काढून घेईन, आणि माझा नवीन द्राक्षारस तयार होईल तेव्हा तो काढून घेईन. तिचे नग्न शरीर झाकण्यासाठी, मी माझी लोकर आणि माझी तागाची वस्त्रे दिली होती ती परत घेईन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून मी हंगामाच्या वेळी तिचे धान्य आणि ऋतुच्या वेळी तिचा द्राक्षरस परत घेईन. तिची लाज झाकण्यासाठी दिलेली माझी लोकर व ताग सुध्दा परत घेईन.