Hosea 4:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पर्वतमाथ्यांवर ते बळी द्तात आणि डोंगरांवर अल्लोन लिबने व एला या वृक्षांखाली धूप जाळतात. ह्या वृक्षांची छाया चांगली असते. म्हणून तुमच्या मुली त्या वृक्षांखाली वेश्यांप्रमाणे झोपतात, आणि तुमच्या सुना व्यभिचाराचे पाप करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते पर्वतांच्या माथ्यांवर यज्ञयाग करतात व टेकड्यांवर ओक, हिवर व एला ह्या झाडांची छाया चांगली असल्यामुळे त्यांच्याखाली धूप जाळतात; म्हणून तुमच्या कन्या व्यभिचार करतात व तुमच्या सुना जारकर्म करतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एला वृक्ष, हिवर आणि एला या झाडांखाली, जिथे सुखदायक सावली असते तिथे पर्वतांच्या शिखरांवर यज्ञ करतात आणि टेकड्यांवर ते होमार्पण करतात. म्हणून तुमच्या कन्या वेश्याव्यवसायाकडे वळतात आणि तुमच्या सुना व्यभिचार करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते पर्वतांच्या शिखरावर बलिदान करतात आणि टेकडयांवर धूप जाळतात, ओक, हिवर, आणि धूप जाळतात, कारण त्यांची सावली चांगली (छान) असते; म्हणून तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्यभिचार करतात.