Hosea 7:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मी इस्राएलला बरे करीन.मगच लोकांना एफ्राईमच्या पापाविषयी कळून येईल. लोकांना शोमरोनाचा खोटेपणाही समजेल. त्या नगरीत ये जा करणाऱ्या चोरांबद्दलही लोकांना समजेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जेव्हा इस्राएलास मी बरे करू पाहतो तेव्हा एफ्राइमाचा अधर्म व शोमरोनाची दुष्टता दिसून येते; ते दगा करतात, चोर घरात शिरतो, बाहेर लुटारूंची टोळी लूट करते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा मी इस्राएलला आरोग्य देतो, तेव्हा एफ्राईमचे पाप आणि शोमरोनचे अपराध प्रकट होतात. ते लबाडी करतात, चोर घरात चोरी करतात, लुटारू रस्त्यावर लूटमार करतात;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा मी इस्राएलास आरोग्य देऊ पाहतो, तेव्हा एफ्राईमाचे पाप आणि शोमरोनाची अधमता उघड होते. ते कट रचतात, चोर आत शिरतो, आणि रस्त्यावर लुटारुंची टोळी हल्ला करते.