Hosea 7:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते मदतीसाठी त्या देशांकडे जातात खरे, पण मी त्यांना सापळ्यात पकडीन. मी माझे जाळे त्यांच्यावर फेकीन, आणि जाळ्यात अडकलेल्या आकाशातील पक्ष्याप्रमाणे मी त्यांना खाली आणीन. त्यांच्या करारांबद्दल मी त्यांना शिक्षा करीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते जातील तेव्हा त्यांच्यावर मी आपले जाळे टाकीन, आकाशातल्या पाखरांप्रमाणे त्यांना खाली पाडीन; त्यांच्या मंडळीने ऐकले आहे त्याप्रमाणे मी त्यांना शिक्षा करीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा ते जातील तेव्हा मी माझे जाळे त्याच्यावर फेकेन; मी त्यांना आकाशातील पक्ष्याप्रमाणे खाली आणेन. जेव्हा मी ऐकेन की ते एकत्र होत आहेत, तेव्हा मी त्यांना पकडेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा ते जातील, मी आपले जाळे त्यांच्यावर टाकेन, आकाशतल्या पक्षांप्रमाणे मी त्यांना खाली आणिन, लोकांच्या समुदायामध्ये मी त्यांना शिक्षा करीन.