Hosea 7:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मनापासून ते मला कधीही बोलावीत नाहीत. हो! ते त्यांच्या बिछान्यात रडतात आणि धान्य व नवीन मद्य मागताना ते स्वत:ला माझ्यापासून अलगच करतात मनाने ते माझ्यापासून दूर गेले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी कधी मनापासून माझा धावा केला नाही; ते आपल्या बिछान्यांवर पडून धान्य व द्राक्षारस ह्यांसाठी ओरडतात; ते जमा होऊन माझ्याविरुद्ध बंड करतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते मला त्यांच्या हृदयापासून हाक मारत नाहीत, परंतु त्यांच्या बिछान्यांवर विलाप करतात. ते धान्य आणि नवीन द्राक्षारसासाठी त्यांच्या दैवतांकडे भीक मागून स्वतःला जखमा करतात, पण ते माझ्यापासून दूर राहतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी त्यांच्या हृदयापासून माझा धावा केला नाही, परंतू ते पलंगावर पडून धान्य व नव्या द्राक्षरसासाठी विलाप करतात, ते माझ्यापासून बहकले आहेत.