Hosea 8:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल लोकांनी मूर्खपणा केला. तो वाऱ्याला पेरण्याप्रमाणे होता. म्हणून त्यांच्यावर संकटे येतील-ते वावटळीचे पीक निर्माण करतील. शेतांत पीक वाढेल, पण त्यापासून अन्न मिळणार नाही. जर काही पिकलेच, तर परकेच ते खाऊन टाकतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण ते वार्याची पेरणी करून वावटळीची कापणी करतात; त्याला ताट नाही, अंकुराला कणीस येत नाही; आलेच तर ते परके खाऊन टाकतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ते वारा पेरतात आणि ते वावटळीची कापणी करतात. त्यांच्या पिकांना कणसे येत नाहीत; त्यातून पीठ तयार होत नाही. जर त्यातून अन्न तयार झाले तर परकीय ते गिळून टाकतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण लोक वारा पेरतात आणि वावटळीची कापणी करतात, उभ्या पिकाला कणीस नाही, ते धान्याचे पिठ उत्पन्न करणार नाही, आणि जर त्याची पूर्ण वाढ झाली तरी परके त्यास गिळून टाकतील.
Recommended Reading