Hosea 9:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल लोक निघून गेले. कारण शत्रूने त्यांच्याकडून सर्वकाही घेतले. पण मिसर त्यांचा स्वीकार करील. मोफ त्यांना मूठमाती देईल. त्यांच्या चांदीच्या खजिन्यांवर रानटी झुडुपे वाढतील. इस्राएल लोकांच्या राहण्याच्या ठिकाणी काटे उगवतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण पाहा, विध्वंस झाल्यामुळे ते निघून गेले आहेत; मिसर त्यांना गोळा करील, मोफ त्यांना मूठमाती देईल; काटेकुसळे त्यांच्या रुपेरी मौल्यवान पदार्थांचा ताबा घेतील, त्यांच्या तंबूत काटेरी झुडपे रुजतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जरी ते नाशापासून सुटले तरी इजिप्त त्यांना गोळा करेल, आणि मेम्फीस त्यांना मूठमाती देतील. काटेकुसळे त्यांच्या चांदीच्या वस्तू नेतील, आणि त्यांच्या तंबूत काटेरी झाडे उगवतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण पहा, जर ते नाशापासून वाचले तर, मिसर त्यांना एकत्र करील आणि मोफ त्यांना मुठमाती देईल, वन्य झाडे त्यांचे सोने, रुपे मिळवतील आणि त्यांचे डेरे काट्यांनी भरून जातील.