Isaiah 1:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सुरूवातीला होते त्याप्रमाणे मी न्यायाधीश नेमीन. पूर्वीप्रमाणेच मंत्री नेमीन मग तुला सर्वजण ‘चांगली व निष्ठावंत नगरी म्हणतील.”‘
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि मी तुझ्यावर पूर्वीप्रमाणे न्यायाधीश व आरंभीच्याप्रमाणे मंत्री पुन्हा नेमीन; आणि मग तुला नीतिमत्तेची नगरी, विश्वासू नगरी म्हणतील.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुमच्या पुढाऱ्यांना परत पूर्वस्थितीत आणेन, तुमचे राज्यकर्त्ये सुरुवातीला होते तसेच त्यांना परत करेन. त्यानंतर तुम्हाला, धार्मिकतेचे शहर, विश्वासू शहर असे म्हटले जाईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुझे सर्व न्यायधीश पूर्वी जसे होते तसे करीन, तुझे सर्व सल्लागार सुरवातीस जसे होते तसे करीन, त्यानंतर तुला नीतिमानांची विश्वासू नगरी म्हणतील.”