Isaiah 10:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पक्ष्याच्या घरट्यातून एखाद्याने सहज अंडी काढून घ्यावीत त्याप्रमाणे माझ्या ह्या दोन हातांनी ह्या सवंर्ाची संपत्ती घेतली आहे. पक्षी नेहमी घरटी व अंडी सोडून जातो. आणि घरट्याचे रक्षण करण्यास कोणीच नसते. तेथे एकही पक्षी चिवचिवाट करायला अथवा पंख व चोच ह्याने टोचा मारायला नसतो. त्यामुळे लोक सहज अंडी काढून घेऊ शकतात. अगदी असेच मी सर्व जगातील माणसांना लुटले. मला थांबविणारा कोणीही नव्हता.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पक्ष्याच्या कोट्याप्रमाणे राष्ट्रांचे धन माझ्या हाती लागले आहे; पक्ष्यांनी टाकून दिलेली अंडी कोणी गोळा करतो त्याप्रमाणे सर्व पृथ्वी मी हस्तगत केली आहे; तेव्हा कोणी पंख फडफडवले नाहीत, तोंड उघडले नाही, चिवचिव केली नाही,”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसा कोणी घरट्यात पोहोचतो, तसेच राष्ट्रांच्या संपत्तीसाठी माझा हात पोहोचला. जसे लोक सोडून दिलेली अंडी गोळा करतात, तसे मी सर्व देशांना एकत्र केले; कोणीही पंख फडफडविला नाही, किंवा किलबिल करण्यासाठी तोंड उघडले नाही.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पक्षाच्या घरट्यातून मिळावे तसे राष्ट्रांचे धन माझ्या हाती लागले आहे, व पक्षांनी टाकून दिलेली अंडी कोणी गोळा करतो त्याप्रमाणे मी सर्व पृथ्वी एकवट केली आहे. कोणी त्यांच्या पंखाची फडफड केली नाही किंवा तोंड उघडले नाही की चिवचिव केली नाही.”