Isaiah 10:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कैद्याप्रमाणे तुम्हाला वाकावे लागेल, मृताप्रमाणे तुम्हाला जमिनीवर पडावे लागेल. पण एवढ्यानेही भागणार नाही. कारण अजूनही देवाचा राग शांत झाला नसेल. अजूनही देव शिक्षा करण्याच्या तयारीत असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बंदिवानांच्या पायांशी दबून राहणे व वध झालेल्यांच्या खाली पडून राहणे ह्यांशिवाय त्यांना दुसरी गती नाही. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बंदिवानांमध्ये लपून बसणे, किंवा मेलेल्यांमध्ये पडून राहाणे या वाचून काहीही उरणार नाही. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बंदिवानांमध्ये पायाशी दबून राहणे व वधलेल्यांमध्ये पडून राहण्याशिवाय काही राहणार नाही, कारण या सर्वामुळे परमेश्वराचा क्रोध कमी होणार नाही परंतु मारण्यासाठी त्याचा हात उगारलेला राहील.