Isaiah 11:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पूर्वी परमेश्वराला राग आला व त्याने समुद्र दुभंगून आपल्या माणसांना मिसरमधून बाहेर काढले आता पण तसेच होईल परमेश्वर युफ्राटिस नदी दुभंगवेल. तो नदीवर हातातील दंड मारील आणि तिचे सात लहान नद्यांत विभाजन करील. त्या नद्या खोल नसतील. लोक त्या चालत सहज पार करू शकतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वर मिसरी समुद्राची खाडी नष्ट करील; तो आपला उष्ण श्वास सोडून आपला हात नदावर (फरातावर) परजील; त्यावर प्रहार करून त्याचे सात फाटे करील; त्यांवरून लोकांना जोडे घालून जाता येईलसे करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह, इजिप्तच्या समुद्राचे आखात कोरडे करतील; होरपळणाऱ्या वाऱ्याने ते फरात नदीवर हात झटकून टाकतील. ते त्याचे सात ओढे पाडतील जेणेकरून पायतणे घालूनही ती ओलांडता येईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर मिसराच्या समुद्राची खाडी दुभागील. आपल्या उष्ण श्वासाने फरात नदीवर आपला हात चालवील, आणि जोडे घालून तिला ओलांडता येईल अशा रीतीने तिला सात फाटयांमध्ये विभागील.