Isaiah 11:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराचे भय वाटण्यातच त्या मुलाला आनंद वाटेल. तो त्याच्या डोळ्यांना जे दिसते वा कानांनी जे ऐकू येते, त्याच्यावरून निर्णय घेणार नाही. हा मुलगा गोष्टी जशा दिसतात त्या वरून लोकांची पारख करणार नाही. तो जे ऐकेल त्यावरून लोकांची परीक्षा करणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल. तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही. कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच तो निर्णय करणार नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि ते याहवेहचे भय बाळगण्यात आनंद मानतील. ते तोंडदेखला न्याय करणार नाहीत, किंवा कानाने ऐकलेल्या गोष्टीवरून ते निर्णय घेणार नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराचे भय त्याचा हर्षोल्हास होईल; त्याच्या डोळ्यांनी काय पाहिले त्यावरून तो न्याय करणार नाही, त्याच्या कानांनी काय ऐकले यावरुन तो निर्णय करणार नाही.