Isaiah 13:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव म्हणतो, “मी जगात वाईट गोष्टी घडवून आणीन. पाप्यांना त्यांच्या पापांबद्दल मी शिक्षा करीन. मी गर्विष्ठांचे गर्वहरण करीन. दुसऱ्यांशी क्षुद्र वृत्तीने वागणाऱ्या बढाईखोरांचा तोरा उतरवीन. तेव्हा थोडेच लोक शिल्लक राहतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी जगाचे त्याच्या दुष्टतेबद्दल व पातक्यांचे त्यांच्या अन्यायाबद्दल पारिपत्य करीन; गर्विष्ठांचा दिमाख बंद करीन, जुलम्यांचा तोरा उतरवीन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी जगाला त्याच्या दुष्टाईबद्दल दुष्टांना त्यांच्या पापांबद्दल शिक्षा करेन. मी गर्विष्ठांचा अहंकार नाहीसा करेन आणि निर्दयी अभिमानींना मी लीन करेन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी जगाला त्यांच्या वाईटासाठी आणि दुष्टांला त्यांच्या अपराधासाठी शिक्षा करीन. मी गर्विष्ठांचा उद्धटपणा आणि निर्दयांचा गर्व उतरवील.