Isaiah 13:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते बाबेलोनमधील तरूणावर हल्ला करून त्यांना मारतील मुलांना ते दया दाखविणार नाहीत. लहानग्यांची ते कीव करणार नाहीत. सदोम व गमोरा यांच्याप्रमाणे बाबेलोनचा संपूर्ण नाश होईल. देव सर्वनाश घडवून आणील मागे काहीही उरणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांची धनुष्ये तरुणांना पाडतील; ते पोटच्या फळावर दया करणार नाहीत; त्यांचे नेत्र मुलांची कीव करणार नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांची धनुष्ये तरुणांना मारून टाकतील; ते तान्ह्या बालकांवर दया करणार नाहीत, किंवा ते लहान मुलांकडे दयेने पाहणार नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांचे बाण तरूणांना भेदून जातील. ते बालकांवर दया करणार नाहीत आणि मुलांना सोडणार नाहीत.