Isaiah 13:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक माणूस भेदरलेला असेल. बाळंत होत असलेल्या स्त्रीप्रमाणे भितीने त्यांच्या पोटात गोळा उठेल. त्यांची तोंडे अग्रीप्रमाणे लाल होतील. सर्वांच्याच तोंडावर ही कळा पाहून ते आश्चर्यचकीत होतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते अगदी घाबरले आहेत. त्यांना पेटके व वेदना घेरत आहेत; प्रसूत होणार्या स्त्रीप्रमाणे ते वेणा देत आहेत. एकमेकांकडे टकमक पाहत आहेत; त्यांची मुखे काळवंडली आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दहशत त्यांच्यावर झडप घालेल, वेदना आणि मनस्ताप त्यांना घट्ट पकडतील; प्रसूती होणाऱ्या स्त्रीप्रमाणे ते वेदनेने गडाबडा लोळतील. भयग्रस्त होऊन ते एकमेकांकडे पाहतील, त्यांचे चेहरे होरपळतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते अगदी घाबरतील; प्रसूत होणाऱ्या स्त्रीप्रमाणे वेणा व वेदना यांनी त्यांना घेरले आहे. ते विस्मयाने एकमेकांकडे पाहतील; त्यांची मुखे ज्वालेच्या मुखांसारखी होतील.