Isaiah 14:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पुढील काळात, परमेश्वर याकोबाला प्रेमाची पुन्हा प्रचिती देईल. तो इस्राएली लोकांची पुन्हा निवड करील. तो त्यांना त्यांची जमीन परत देईल. यहुद्यां व्यतिरिक्त अन्य लोक त्यांना येऊन मिळतील. ते एकत्र होतील आणि त्यांचा एकच वंश याकोबाचा वंश होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण याकोबावर परमेश्वर दया करील; तो पुन्हा इस्राएलास निवडून घेईल, त्यांना त्यांच्या स्वदेशात वसवील; त्यांना परके येऊन मिळतील; ते याकोबाच्या घराण्याशी लगटून राहतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेह याकोबवर दया करतील; पुन्हा एकदा ते इस्राएलची निवड करतील आणि त्यांना त्यांच्या मातृभूमीत स्थायी करतील. परदेशी लोक त्यांच्यात सामील होतील आणि याकोबाच्या वंशजांसोबत एकत्र येतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर याकोबावर दया करील; तो इस्राएलाची पुन्हा निवड करील आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या देशात स्थापील. परके त्यांच्यात सहभागी होतील आणि ते स्वतः याकोबाच्या घराण्याला जडून राहतील.