Isaiah 14:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इतर राष्ट्रे इस्राएलला त्याची जमीन परत देतील, इतर राष्ट्रांतील स्त्री पुरूष इस्राएलचे गुलाम होतील. पूर्वी ह्याच लोकांनी इस्राएलच्या प्रजेला गुलाम होण्यास भाग पाडले होते. पण आता इस्राएलच त्यांचा पराभव करील व त्यांच्यावर राज्य करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
विदेशी लोक त्यांना नेऊन स्वस्थानी पोचवतील; आणि इस्राएलाचे घराणे परमेश्वराच्या भूमीत त्यांना दासदासी करून ठेवील; ज्यांनी त्यांना बंदिवान करून नेले होते त्यांना ते बंदीत ठेवतील; असे ते आपणांस पिडणार्‍यांवर स्वामित्व करतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अनेक राष्ट्रे त्यांना सहकार्य करतील व त्यांना त्यांच्या जागी आणतील. आणि इस्राएल राष्ट्रांवर ताबा मिळवतील, व याहवेहच्या भूमीत त्यांच्या स्त्रिया व पुरुषांना आपले सेवक बनवतील, त्यांना बंदिवासात नेलेल्यांना ते बंदी करतील त्यांना पीडलेल्यांवर ते राज्य करतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राष्ट्रे त्यांना आपल्या स्वतःच्या ठिकाणावर आणतील. मग इस्राएलाचे घराणे त्यांना परमेश्वराच्या देशात दास व दासी करून ठेवतील. ज्यांनी त्यास बंदिवान करून नेले होते त्यास ते बंदीत ठेवतील आणि ते आपल्या पीडणाऱ्यावर राज्य करतील.