Isaiah 14:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पलेशेथ देशा, तुला पराभूत करणारा राजा गेला म्हणून तुला आनंद झाला आहे. पण खरे तर तुला आनंद व्हायचे काही कारण नाही. हे खरे आहे की त्या राजाची सत्ता संपली आहे. पण राजाचा मुलगा गादीवर बसेल व राज्य करील. हे एका सापाने दुसऱ्या अती विषारी सापाला जन्म दिल्यासारखे होईल. हा नवा राजा तुझ्या दृष्टीने चपळ व भयानक सापासारखा असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“हे समग्र पलेशेथा, तुला मारणारा सोटा मोडला आहे म्हणून आनंद करू नकोस, कारण सापाच्या मुळातून फुरसे निघेल, त्याचे फळ उडता आग्या साप होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहो पलिष्टी लोकांनो, ज्या दांडक्याने तुम्हाला मारले तो मोडला आहे म्हणून आनंद करू नका. तरी त्या सापापासून फुरसे निपजेल त्याचे फळ तुमचा वेध घेणारे विषारी नाग असतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अगे पलिष्टी, तुला मारणारी काठी मोडली आहे म्हणून आनंद करू नको. कारण सापाच्या मुळातून फुरसे निघेल आणि उडता आग्या सर्प त्याचे फळ होईल.