Isaiah 14:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नगरच्या वेशीजवळील प्रजाजनांनो, रडा. नगरवासीयांनो, आक्रोश करा. पलेशेथ मधील सर्व लोक भयभीत होतील. त्यांचे धैर्य गरम मेणाप्रमाणे वितळून जाईल. उत्तरेकडे पाहा! धुळीचा लोट उठला आहे. अश्शूरचे सैन्य येत आहे. त्या सैन्यातील सर्व माणसे बलवान आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अगे वेशी, हायहाय कर; अगे नगरी, ओरड; हे पलेशेथा, तू सर्वस्वी वितळून जाशील; कारण उत्तरेकडून धूर येत आहे; त्याच्या सैन्यापैकी कोणी चुकून मागे राहणार नाही.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वेशींनो, आक्रोश करा! नगरांनो विलाप करा! पलिष्टी लोकांनो, भयाने वितळून जा! कारण उत्तरेकडून धुराचा लोट येत आहे, त्यांच्या पलटणींत कोणीही रेंगाळणारे नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वेशीनो मोठ्याने आक्रोश करा; नगरांनो आरोळी करा. पलिष्टी तू सर्व वितळून जाशील. कारण उत्तरेकडून धुराचे ढग येत आहे आणि तेथे त्याच्या सैन्यात मागे राहणारा कोणी नाही.