Isaiah 15:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हेशबोन व एलाले येथील लोक एवढ्यामोठ्याने रडत आहेत की त्यांचा आवाज दूरच्या याहसा शहरापर्यंत ऐकू येत आहे. एवढेच काय पण सैनिकही गर्भगळीत होऊन भीतीने कापत आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेशबोन व एलाले ही ओरडत आहेत, याहसापर्यंत त्यांचा आक्रोश ऐकू जात आहे; ह्यास्तव मवाबाचे हत्यारबंद लोक आरोळ्या देत आहेत; त्यांचा जीव घाबरा झाला आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेशबोन आणि एलिआलेह रडतात, त्यांचा आक्रोश दूरवर याहसपर्यंत ऐकू येतो. म्हणून मोआबचे सशस्त्र लोक आक्रोश करतात, आणि त्यांची अंतःकरणे दुर्बल झाली आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेशबोन व एलाले आरोळी मारत आहेत; त्यांचा आवाज याहसापर्यंत ऐकू जात आहे. यामुळे मवाबाचे शस्त्रधारी माणसे आरोळ्या देत आहेत; त्यांचा जीव त्यांच्यात थरथरत आहे.