Isaiah 16:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारमेलमध्ये (द्राक्षमळ्यात) आनंदगान होणार नाही. सुगीच्या काळातील आनंद मी कोणालाही होऊ देणार नाही. द्राक्ष मद्य काढण्यासाठी तयार आहेत पण ती नासून जातील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सुपीक मळ्यातला आनंद व उल्लास नाहीसा झाला; द्राक्षीच्या मळ्यात गायनाचा व हर्षाचा गजर होत नाही; द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवून कोणी द्राक्षारस काढत नाही; द्राक्षांच्या हंगामातला उत्सवशब्द मी बंद केला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फळबागेतून आनंद आणि हर्ष काढून घेतला आहे; द्राक्षमळ्यात कोणीही गाणे गात नाही किंवा हर्षनाद करत नाही; कोणीही द्राक्षकुंडातून द्राक्षारस काढीत नाही, कारण मी हर्षनाद करणे संपवून टाकले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उपवनातील फळ झाडांपासून आनंद व उल्लास नाहीसा झाला आहे; आणि तुमच्या द्राक्षमळ्यात तेथे गायनाचा व आनंदाचा गजर होत नाही. व्यापारी दाबून मद्य काढण्याचे व्यवसाय करणार नाही; द्राक्षांच्या हंगामातील आनंदाचा गजर मी बंद केला आहे.