Isaiah 16:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मवाबमधील लोकांना बळजबरीने त्यांची घरे सोडावी लागली. म्हणून त्यांना तुमच्या देशात राहू द्या. शत्रूंपासून त्यांना लपवा. लुटालूट थांबेल. शत्रूचा पराभव होईल. दुसऱ्यांना त्रास देणारे ह्या भूमीतून जातील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या घालवून दिलेल्यांना तुझ्याजवळ राहू दे; मवाबाला लुटारूंपासून आसरा हो; कारण पिळून काढणारा नष्ट झाला आहे; नासधूस बंद झाली आहे; पायमल्ली करणारे देशातून नाहीतसे झाले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पलायन केलेल्या मोआबी लोकांना तुमच्याबरोबर राहू द्या; संहारकापासून त्यांचा आश्रय व्हा.” जुलूम करणाऱ्याचा शेवट होईल, आणि नाश थांबेल; आक्रमण करणारे नाहीसे होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मवाबामधील निर्वासितास, तुझ्यात राहू दे; तू त्यांना नाश करणाऱ्यापासून लपण्याचे ठिकाण हो. कारण जुलूम करणारा थांबेल आणि नासधूस बंद होईल. ज्यांनी तुडवले ते देशातून नाहीसे होतील.