Isaiah 16:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हेशबोनमधील मळे व सिब्मेच्या द्राक्षवेली सुकून गेल्या म्हणून लोकांना वाईट वाटेल. परकीय राजांनी द्राक्षवेली तोडून टाकल्या. शत्रूचे सैन्य दूर याजेरपर्यत पसरले आहे. ते वाळवंटापासून समुद्रापर्यंत पसरले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हेशबोनाचे मळे व सिब्मेच्या द्राक्षलता ही सुकून गेली आहेत; राष्ट्रांच्या अधिपतींनी तिच्या लतांचे अंकुर खुडून टाकले आहेत. ती याजेरापर्यंत विस्तारली होती, ती रानातही पसरली होती; तिच्या फांद्या चोहोकडे पसरून समुद्रापलीकडे गेल्या होत्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हेशबोनची शेते सुकून गेली आहेत, सिबमाहच्या द्राक्षवेलीसुद्धा. ज्या एकवेळी याजेरपर्यंत पोहोचल्या होत्या आणि वाळवंटाकडे पसरत गेल्या होत्या, त्या खास निवडलेल्या द्राक्षवेली इतर देशांच्या राज्यकर्त्यांनी तुडवून टाकल्या आहेत. त्यांची कोंबे बाहेर पसरली आणि ती समुद्रापर्यंत गेली आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हेशबोनाची शेते व त्याचप्रमाणे सिब्मेच्या द्राक्षवेली सुकून गेल्या आहेत. राष्ट्रांच्या अधिपतींनी निवडलेल्या द्राक्षवेली पायदळी तुडवल्या आहेत त्या याजेरास पोहचल्या आणि रानामध्ये पसरून गेल्या होत्या. त्यांचा कोंब चोहोकडे पसरून समुद्राच्या पार गेला होता.