Isaiah 17:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दमास्कसला हा शोक संदेश आहे. परमेश्वर म्हणतो की पुढील गोष्टी दमास्कसला घडतील. “आता दमास्कस एक शहर आहे. पण त्याचा नाश होईल. फक्त पडझड झालेल्या इमारती तेथे शिल्लक राहतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दिमिष्काविषयीची देववाणी: पाहा, दिमिष्क हे नगर ह्या नावाला मुकले आहे; ते मोडतोडीचा ढीग बनले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दिमिष्का विरुद्ध भविष्यवाणी: “पहा, दिमिष्क आता शहर असे राहणार नाही परंतु ते नाशवंत वस्तूंचा ढिगारा असे होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दिमिष्काविषयीची घोषणा. पाहा, दिमिष्क हे एक नगर म्हणून राहणार नाही; ते नासाडीचा ढीग होईल.