Isaiah 17:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एके दिवशी तू द्राक्षवेलींची लागवड करशील, त्या वाढाव्या म्हणून प्रयत्न करशील. दुसऱ्या दिवसापासून त्या वाढूही लागतील पण सुगीच्या काळात तू फळे गोळा करायला जाशील तेव्हा तुला सगळे सुकून गेलेले दिसेल. रोगाने सर्व वेली मरून जातील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती तू लावलीस त्या दिवशी त्यांना तू कुंपण घातलेस व लावलेले बी दुसर्या दिवशी सकाळी फुलावे असे केलेस; पण त्याचा हंगाम दुःखाच्या व दुःसह क्लेशाच्या दिवशी केराचा ढीग होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या दिवशी तुम्ही त्यांना लावता, तुम्ही त्यांना वाढविता, आणि सकाळी तुम्ही त्यांची पेरणी करता, तेव्हा तुम्ही त्यांना अंकुर फुटू देता, तरीसुद्धा रोग आणि असाध्य वेदना होणाऱ्या दिवसामध्ये त्यांचे काहीच उत्पादन होणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवशी तू लाविले आणि कुंपण घातले व मशागत केली. लवकरच तुझे बीज वाढले, परंतु त्याचा हंगाम दुःखाच्या व भारी शोकाच्या दिवशी अयशस्वी होईल.