Isaiah 17:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एफ्राइमची (इस्राएलची) किल्ले असलेली शहरे नष्ट होतील. दमास्कसचे सरकार पडेल. इस्राएलला जे घडले तेच सिरीयात घडेल. सगळी प्रतिष्ठित माणसे दूर केली जातील.” सर्वशक्तिमान परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे ह्या गोष्टी घडतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एफ्राइमाची तटबंदी, दिमिष्काचे राज्य व अरामाचा अवशेष ही नाहीतशी होतील; इस्राएलाच्या वैभवाची गत झाली तशी त्यांची होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तटबंदी केलेले शहर एफ्राईमपासून नाहीसे होईल, आणि दिमिष्कमधून शाही सामर्थ्य नाहीसे होईल; अराम नगरातील अवशिष्ट इस्राएली लोकांच्या वैभवासारखे असतील,” असे सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एफ्राइमापासून तटबंदीची नगरे नाहीशी होतील. दिमिष्कापासून त्याचे राज्य आणि अरामाचा अवशेष ही नाहीसे होतील, ही इस्राएल लोकांच्या गौरवासारखी होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.