Isaiah 17:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो काळ जैतूनच्या मोसमाप्रमाणेही असेल. लोक झाड हलवून जैतूनची फळे पाडतात. पण काही झाडावर राहतातच. उंचावरच्या फांद्यावर चार-पाच फळे राहून जातातच. ह्या शहरांचेही असेच होईल. सर्वशक्तिमान परमेश्वराने हे सांगितले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी जैतून झाड हलवले असता त्यावर काही फळे शिल्लक राहतात, वरच्या फांदीवर दोनतीन व त्याच्या अगदी बाहेर पसरलेल्या बहुफल शाखांवर चारपाच राहतात, तसा त्यांचा शेष राहील, असे परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसे जैतुनाच्या झाडाला झोडपतात तेव्हा उंचटोकाच्या फांद्यांवर दोन किंवा तीन जैतून, आणि फळ देणाऱ्या मोठ्या फांद्यांवर चार किंवा पाच जैतून राहून जातात, तसे जमा करण्याचे काही शिल्लक राहील,” असे इस्राएलचे परमेश्वर याहवेह घोषित करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जसे जेव्हा जैतून झाड हलविले असता त्यावर काही फळे शिल्लक राहतात, दोन किंवा तीन फळे सर्वाहून उंच शेंड्यावर राहतात, चार किंवा पाच त्याच्या उंचावरच्या फलदायी फांद्यावर राहतात, असे परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो.