Isaiah 17:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या वेळेला किल्ले असलेली सर्व शहरे ओस पडतील. इस्राएलचे लोक येण्याआधी त्या भूमीवर जसे डोंगर आणि जंगले होती त्याप्रमाणे ती शहरे होतील. पूर्वी इस्राएली लोकांना येताना पाहून तेथे राहणारे लोक पळून गेले. भविष्यात परत एकदा देश ओस पडेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवशी इस्राएलाच्या भीतीस्तव सोडून दिलेल्या व उद्ध्वस्त झालेल्या वनातील आणि डोंगराच्या माथ्यावरील स्थलांप्रमाणे त्याची तटबंदीची नगरे होतील; ती उजाड होतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दिवशी त्यांची आश्रयस्थान असलेली शहरे, जी त्यांनी इस्राएली लोकांमुळे सोडली होती, ती आता काटेरी झाडे आणि झुडपे वाढत असलेल्या ठिकाणांसारखी होतील. ती सर्व उजाड होतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवसात त्यांची बळकट नगरे डोंगराच्या माथ्यावरील वनराईच्या उतारावर सोडलेल्या ठिकाणांसारखी, जी ठिकाणे इस्राएल लोकांच्यामुळे त्यांनी सोडली होती त्यासारखी होतील, आणि तेथे ती ओस पडतील.