Isaiah 18:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेथील लोक बांबूच्या नावातून समुद्र पार करतात. शीघ्रगती दुतांनो, त्या उंच आणि बलवान लोकांकडे जा. (ह्या उंच व धडधाकट लोकांना इतर लोक घाबरतात. त्याचे राष्ट्र बलशाली आहे. त्यांच्या राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राचा पराभव केला आहे. त्यांचा देश नद्यांनी विभागलेला आहे.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो पाण्यावर चालणार्‍या लव्हाळ्यांच्या नावांतून जलमार्गाने वकील पाठवतो. शीघ्रगती दूतांनो, त्या उंच बांध्याच्या व तुळतुळीत अंगाच्या राष्ट्रांकडे जा; ते लोक मुळापासूनच भयंकर आहेत. ते हुकूमत चालवणारे व पादाक्रांत करणारे राष्ट्र आहे; त्याची भूमी नद्यांनी विभागलेली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो समुद्रमार्गाने पाण्यावरून पापिरस नौकांमधून दूतांना पाठवितो. जा, जलदगतीने जाणाऱ्या दूतांनो, धिप्पाड आणि तुळतुळीत त्वचेच्या लोकांकडे जा, त्यांची जबर असलेल्या दूरवरच्या लोकांकडे, विक्षिप्त भाषण करणारे आक्रमक राष्ट्र, ज्यांची भूमी नद्यांमुळे विभागली गेली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो समुद्रातून, लव्हाळ्यांच्या पात्रातून जलावर वकील पाठवतो. शीघ्रगती दूतांनो, त्या उंच आणि मनमिळावू राष्ट्रांकडे, जे लोक भीतीपासून दूर व जवळ आहेत त्यांच्याकडे, जे बलवान व अजिंक्य राष्ट्र, ज्याची भूमी नद्यांनी विभागली आहे त्याच्याकडे जा,