Isaiah 18:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांना इशारा करा की त्यांचे काहीतरी वाईट होणार आहे. त्या राष्ट्रांचे वाईट होताना जगातील सर्व लोक पाहतील. डोंगरावर फडकणाऱ्या ध्वजाप्रमाणे ही गोष्ट सर्वांना स्वच्छ दिसेल. ह्या उंच लोकांबाबत घडणारी गोष्ट जगातील सर्व लोक रणशिंगाच्या आवाजाप्रमाणे स्पष्टपणे ऐकतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहो भूतलवासी अखिल जनहो, पृथ्वीवरील रहिवाशांनो, पर्वतांवर ध्वज उभारण्यात येईल तेव्हा तुम्ही पाहा; तुतारी वाजवण्यात येईल तेव्हा ऐका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहो तुम्ही जगातील सर्व लोकहो, तुम्ही जे पृथ्वीवर राहता, जेव्हा पर्वतांवर झेंडा उभारला जाईल, तेव्हा तुम्हाला तो दिसेल, आणि जेव्हा तुतारी वाजेल तेव्हा तुम्ही ती ऐकाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहो जगातल्या सर्व रहिवाश्यांनो आणि जे कोणी पृथ्वीवर राहणाऱ्यांनो, जेव्हा पर्वतावरून निशाण उंचविण्यात येईल तेव्हा पाहा; आणि जेव्हा कर्णा फुंकण्यात येईल तेव्हा ऐका.