Isaiah 18:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
उन्हाळ्यातील प्रसन्न दिवशी दुपारी लोक विश्रांती घेत असतील. (उन्हाळा असल्यामुळे पाऊस अजिबात नसेल. फक्त सकाळी दव असेल.) तेव्हाच काहीतरी भयानक घडेल. सगळीकडे फुले फुललेली असतील, द्राक्षे पिकत असतील, पण सुगीचा हंगाम येण्याआधीच शत्रू येईल व सर्व झाडे कापून टाकील. तो द्राक्षाच्या वेली तोडून फेकून देईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण मोहर गळाल्यावर त्याच्या जागी द्राक्षे येऊन पिकायला लागतात, तेव्हा हंगामापूर्वी तो कोयत्यांनी डाहळ्या छाटील व पसरलेल्या फांद्या तोडून टाकील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण, कापणीच्या आधी, जेव्हा फुलोरा संपेल आणि फुले पिकलेले द्राक्ष होतात, ते छाटणीच्या सुऱ्यांनी फुटलेले कोंब कापून टाकतील, आणि पसरत असलेल्या फांद्या कापून टाकतील आणि काढून टाकतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कापणीच्यापूर्वी, जेव्हा बहार संपल्यावर फुले द्राक्षात पिकू लागतात, तेव्हा तो कोयत्याने डहाळ्या कापील व खाली काढून टाकेल आणि पसरलेल्या फांद्या काढून टाकेल.